देव वसे चित्ती अभंगाचा अर्थ| देव वसे चित्ती त्याची घडावी संगती अभंग| देव वसे चित्ती त्याची घडावी संगती| dev vase chitti abhang
देव वसे चित्ती ।
त्याची घडावी संगती ॥ १ ॥
ऐसें आवडतें मना ।
देवा पुरवावी वासना ॥ २ ॥
हरिजनासवें भेटी ।
न हो अंगसंगें तुटी ॥ ३ ॥
तुका म्हणे जिणें ।
भले संत संघष्टणें ॥ ४ ॥
- संत तुकाराम महाराज अभंग
देव वसे चित्ती अभंगाचा अर्थ| देव वसे चित्ती त्याची घडावी संगती अभंग| देव वसे चित्ती त्याची घडावी संगती| dev vase chitti abhang
अभंगाचा भावार्थ
राम कृष्ण हरी मंडळी आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातील अतिशय गोड अभंग "देव वसे चित्ती त्याची घडावी संगती" या अभंगाचा आपण थोडक्यात आणि सोप्या शब्दात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज देवाला विनंती करतात आणि सांगतात की, हे देवा ज्यांच्या कंठी देवाचे नाव असते जे नित्य तुझे भजन करतात अशा व्यक्तींशी माझी संगती घडू दे.
पुढच्या चरणात महाराज सांगतात की ज्या संतांच्या मुखात नित्य देवाचे नाव असते अशा संतांच्या संगतीत राहणे मला खूप आवडते म्हणून, हे देवा तू माझी ही वासना पूर्ण करावी अशी इच्छा संत तुकाराम महाराज देवाकडे व्यक्त करतात.
तिसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज देवाला विनंती करून सांगतात की, हे देवा तुझे नित्य भजन आणि नामस्मरण करणाऱ्या हरिजनांशी माझी भेट घडवून आण आणि त्यांचा संगती कधीच तुटू नये ही काळजी घे.
अभंगाच्या शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज देवाला सांगतात आणि विनंती करतात की, हे देवा ज्यांच्या मुखात नित्य तुझे नाम असते जे नित्य भजन करतात अश्या संत आणि हरिजनांमध्येच मला माझे उरलेले जीवन व्यतीत करायचे आहे. या संतांच्या संगतीतच मला जीवन व्यतीत करणे आता मला मोलाचे वाटत आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा मागणी पर प्रकरणातील अभंग "देव वसे चित्ती त्याची घडावी संगती" या अभंगाचा आपण थोडक्यात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराज देवाला विनंती करतात की देवा मला या संतांच्या संगतीतच राहणे आवडते म्हणून ही माझी वासना पूर्ण कर. वारकरी बंधूंनो अभंगाचा भावार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा राम कृष्ण हरी...
देव वसे चित्ती अभंगाचा अर्थ
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती अभंग
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती
देव वसे चित्ती अभंग
dev vase chitti abhang
0 टिप्पणियाँ