माझे मज कळो येती अवगुण| माझे मज कळो येती अवगुण अभंग| maze maj kalo yeti avgun
काय करूं मन अनावर ॥ १ ॥
आतां आड उभा राहें नारायणा ।
दयासिंधुपणा साच करीं ॥ २ ॥
वाचा वदे परी करणे कठिण ।
इंद्रियां अधीन झालों देवा ॥ ३ ॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास ।
न धरी उदास मायबापा ॥ ४ ॥
- संत तुकाराम महाराज अभंग
माझे मज कळो येती अवगुण| माझे मज कळो येती अवगुण अभंग| maze maj kalo yeti avgun
अभंगाचा भावार्थ
राम कृष्ण हरी वारकरी बंधूंनो आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा करुणापर प्रकरणातील अभंग माझे मज कळो येती अवगुण या अभंगाचा आपण थोडक्यात आणि सोप्या शब्दात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज देवाला सांगतात की, हे देवा मला माझे अवगुण कळून येत आहे पण काय करू माझे मन खूप अनावर आहे. ते मन माझे ऐकत नाही. ते मन सारखे विषयांकडे धाव घेत असते.
पुढे संत तुकाराम महाराज देवाला विनंती करतात की, हे देवा माझे अवगुण मला कळतात, मी कितीही परमार्थात राहण्याचा प्रयत्न केला तरी ते मन माझे ऐकत नाही. म्हणून, हे देवा तू आता माझ्या अवगुणांना दूर करण्यासाठी आडवा उभा रहा. तूच माझी मदत कर. तू तर दयेचा सागर आहेस म्हणून तू माझ्या अवगुणांना दूर करण्यासाठी आडवा उभा रहा.
अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज सांगतात की, माझी वाचा परमार्था विषयी खूप गप्पा मारते पण, जसं मी बोलतो त्याप्रमाणे वागणे खूप कठीण आहे. कारण मी इंद्रियांच्या अधीन झालो आहे.
शेवटी देवाला विनंती करून संत तुकाराम महाराज सांगतात की, हे देवा माझे मन जरी अनावर असले, मी इंद्रियांच्या अधीन जरी झालो असलो, माझ्यात अनेक अवगुण आहेत पण, मी कसा का होईना तुझा दास आहे माझ्या या भक्तीला स्वीकार कर आणि माझ्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून माझ्या अवगुणांचा तू राग मानू नकोस.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा माझे मज कळो येती अवगुण या अभंगाचा आपण थोडक्यात आणि सोप्या शब्दात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अभंगाचा भावार्थ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा राम कृष्ण हरी...
माझे मज कळो येती अवगुण
माझे मज कळो येती अवगुण अभंग
maze maj kalo yeti avgun
0 टिप्पणियाँ