सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग अर्थ| sundar te dhyan ubhe vitevari

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग अर्थ| sundar te dhyan ubhe vitevari


सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥ १ ॥

तुळसीहार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ २ ॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥ ३ ॥

तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥ ४ ॥

- संत तुकाराम महाराज अभंग


सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग अर्थ| sundar te dhyan ubhe vitevari


राम कृष्ण हरी वारकरी बंधूंनो देहूचे महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा देवाची स्तुती करणारा देवाचे वर्णन करणारा अतिशय प्रसिद्ध आणि भजनात तसेच कीर्तनांमध्ये नेहमी म्हटला जाणारा अभंग या अभंगाचा भावार्थ आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

संत तुकाराम अभंगाच्या पहिल्या चरणात देवाचे वर्णन करतात आणि सांगतात की तो देव म्हणजेच श्री विठ्ठल त्याचे रूप खूपच सुंदर आहे. तो इतका गोड आहे की त्याला पाहून समाधी लागावी असे त्याचे रूप आहे. आपले दोन्ही कर म्हणजेच आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून एका विटेवर स्तब्ध उभा आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी "उभा" या शब्दाचा सखोल अर्थ घेतलेला आहे. तुकाराम महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात की तो श्री विठ्ठल अशा प्रकारे उभा आहे की जणू काही तो कोणाची वाट बघत आहे. ज्यावेळी भक्त पुंडलिकाला देव भेटायला आला तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत होते. त्याचवेळी भक्त पुंडलिकाने देवाला सांगितले की देवा ही वीट घे आणि तू  ह्या विटेवर उभा राहा मी थोड्या वेळातच माझ्या आई-वडिलांची सेवा करून तुझ्या जवळ येतो. याचा अर्थ असा होतो की तो विठुराया आपल्या भक्ताची वाट पाहण्यासाठी कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज देवाच्या रूपाचे वर्णन करतात आणि सांगतात की त्या विठुरायाने आपल्या गळ्यात तुळशीची माळ धारण केलेली आहे तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे ज्याला आपण पितांबर म्हणतो. आणि हे असे रूप तुकाराम महाराजांना निरंतर आवडते. असे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात एका शब्दाचा वापर करतात तो म्हणजे निरंतर दुसऱ्या चरणामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे "निरंतर" आहे. या निरंतर शब्दाचा अर्थ म्हणजे तुकाराम महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात की त्या देवाचे रूप मला केवळ आवडत नाही तर निरंतरपणे आवडते. या संसारात कोणालाही एखाद्याची रूप आवडते पण ते काही क्षणापुरताच आवडते मात्र या ठिकाणी संत तुकाराम महाराज सांगतात की मला त्या विठुरायाचे रूप निरंतरपणे आवडते. 

अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज सांगतात की त्या श्री विठ्ठलाने आपल्या कानामध्ये जे कुंडल घातलेले आहे ते कुंडल म्हणजे साधारण कुंडल नव्हे तर ते मकर कुंडले आहेत. मकर या शब्दाचा अर्थ म्हणजे मासा. त्या विठुरायाने आपल्या कानात माशाच्या आकाराचे सोन्याचे कुंडल धारण केले आहे त्यासोबतच गळ्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कौस्तुभ नावाचा मणी धारण केला आहे.

अभंगाच्या शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज सांगतात की, त्या विठुरायाचे रूप मला इतके आवडले आहे की तुकाराम महाराजांना दुसऱ्या कोणत्याच वस्तूंमध्ये सुख मिळत नाही केवळ त्या विठुरायाच्या मुख पाहण्यातच सुख मिळते. त्या विठुरायाच्या भजनात त्याच्या नाम जप मध्येच तुकाराम महाराजांना सुख मिळते. अशा त्या विठुरायाचे रूप तुकाराम महाराज खूप आवडीने पाहतात. 

संत तुकाराम महाराजांचा "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" हा अभंग संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. तुकाराम महाराज या अभंगातून देवाच्या रूपाचे वर्णन करतात मात्र प्रत्येक शब्द अशा प्रकारे वापरतात की त्या शब्दाचा अर्थ सखोल असा आहे. या ठिकाणी आपण या अभंगाचा साध्या आणि सोप्या शब्दांत भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ असाच असेल असे नाही कारण, संत जसे दिसतात तसे नसतात त्याचप्रमाणे संतांच्या अभंगाचा शब्दशः अर्थ कधीही घेऊ नये. त्यांच्या वणीची बरोबरी आपण सामान्य व्यक्ती कधीही करू शकत नाही. अभंगाचा भावार्थ थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा राम कृष्ण हरी.


सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग अर्थ
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अर्थ
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
sundar te dhyan ubhe vitevari



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ