रूप पाहता लोचनी अभंग अर्थ| roop pahata lochani
सुख झालें वो साजणी ॥ १ ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥ २ ॥
बहुता सुकृताची जोडी ।
म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवर ॥ ४ ॥
- संत ज्ञानेश्वर महाराज
रूप पाहता लोचनी अभंग अर्थ| roop pahata lochani
राम कृष्ण हरी मित्रांनो आपण ज्यांना माऊली म्हणून ओळखतो जे वारकरी संप्रदाय चे आधारस्तंभ आहेत ते म्हणजे महान संत माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा अतिशय गोड आणि भजनांमध्ये तसेच कीर्तनांमध्ये सर्वात आधी म्हटला जाणारा अभंग या अभंगाचा भावार्थ आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
माऊलींना त्यांच्या गुरुकृपामुळे आणि अध्यात्माचा अभ्यास करून झालेला अनुभव आपल्याला सांगतात. माऊली सांगतात की मी त्या देवाचे रूप पाहिले आहे तो अतिशय गोड आणि खूपच सुंदर आहे. तो इतका सुंदर आहे की त्याला पाहून माझे मन सुखावले आहे. त्या देवाला कोणी विठ्ठल म्हणते तर कोणी माधव म्हणत असते असा तो आमचा देव त्याला पाहून मन तृप्त झाले.
अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली सांगतात की त्या देवाचे म्हणजेच त्या विठुरायाचे भजन करायला मला खूप आवडते याचे कारण म्हणजे गेल्या जन्मात मी चांगले कर्म केले आहेत म्हणून तो विठ्ठल मला या जन्मात आवडतो.
अभंगाचे शेवटच्या चरणात माऊली सांगतात की माझे वडील आणि रुक्मिणीचे पती म्हणजेच श्री विठ्ठल हा सर्व सुखाचे आगर आहे अर्थात सर्व सुख त्याच्या पायाशी आहे. त्याचे भजन करून आम्हाला अपार सुख मिळते. त्याचे नाम जप करून आम्हाला सुख मिळते तो म्हणजे आमच्या सुखाचे भांडार असे माऊली या अभंगातून सांगतात.
संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींचा अभंग हा अतिशय प्रसिद्ध आणि देवाला पाहून माऊली आपले अनुभव या अभंगातून व्यक्त करतात. या अभंगाचा आपण थोडक्यात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला भावार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
रूप पाहता लोचनी अभंग अर्थ
रूप पाहता लोचनी अभंग
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
roop pahata lochani
0 टिप्पणियाँ