देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अर्थ| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी| devachiye dwari ubha kshan bhari abhang
तेणे मुक्ती चारि साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनी संसारी जीव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥
- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अर्थ| devachiye dwari ubha kshan bhari abhang
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अर्थ - वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असणारे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊली यांनी लिहिलेला हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा आणि सर्वात प्रसिद्ध अभंग "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" या अभंगाचा आपण थोडक्यात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माऊलींचे हरीपाठातील अभंग दिसायला सोपे असले तरी त्यांचा सखोल असा अर्थ निघत असतो म्हणून माऊलींच्या हरिपाठातील अभंगांचा शब्दशः अर्थ कधीही घेऊ नये.
माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की प्रत्येक व्यक्तीने जन्मास आल्यानंतर देवाच्या दारात उभे राहिले पाहिजे. द्वार हे अनेक प्रकारचे असतात ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण कशाच्या दारात उभे आहोत. ते विषयांचे दार देखील असू शकतं तर ते संसाराचे दार देखील असू शकते. माऊली आपल्याला उपदेश करतात की इतर दुसऱ्या कोणत्याही दारात उभे न राहता आपण देवाच्या दारात उभे राहिलो पाहिजे अर्थात देवाला शरण गेलो पाहिजे. ज्यावेळी आपण देवाला शरण जातो, देवाला आपलंसं करतो त्यावेळी आपण चार प्रकारच्या मुक्ती साध्य करीत असतो.
दुसऱ्या चरणात माऊली सांगतात की केवळ देवाच्या दारात उभे राहू नका तर तुम्ही नामसंकीर्तन करा मुखाने हरी हरी म्हणा ज्यावेळी तुम्ही मुखाने हरी हरी म्हणाल त्यावेळी तुमच्याकडून अनेक पुण्याची जोड होईल. म्हणून माऊली सांगतात की जेव्हा तुम्ही हरी हरी म्हणाल तेव्हा तुमच्याकडून इतके पुण्य घडून येईल की त्याचे मोजमाप देखील करता येणार नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही केवळ हरी हरी म्हणा आणि परमेश्वराचे भजन करा मात्र भजन करीत असताना आपण किती पुण्य संचय केली याचा विचार करू नका.
अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली सांगतात की तुम्ही संसारी असले तरीही चालेल मात्र, जीवनात केवळ संसार करू नका. संसार करीत असताना आपले मन आणि चित्त देवाजवळ घेऊन जा देवाचे नित्य भजन करा असे माऊली प्रमाण देऊन सांगतात की हे मी नाही सांगत तर वेदशास्त्र पुराने हात वरती करून सांगतात की संसारी असूनही तुम्ही देवाचे भजन करा. अर्थात "संसारी असावे असूनी नसावे"
शेवटच्या चरणात माऊली उदाहरण देऊन सांगतात की जेव्हा तुम्ही देवाला आपलंसं करणार, जेव्हा तुम्ही देवाचे नित्यनेमाने भजन करणार, मुखातून हरी हरी म्हणणार त्यावेळी देव स्वतःहून तुमच्या जवळ येईल. याचे प्रमाण म्हणजे व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील प्रसंग तो म्हणजे की, पांडव नेहमी देवाचे भजन करायचे, पांडवांनी कधीही धर्म सोडला नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांच्या बाजूने युध्दात उभा राहिला. पांडवांचे रक्षण केले तसेच त्यांच्या घरी राहून त्यांची कामे देखील करू लागला.
"देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" ह्या अभंगाचा आपण थोडक्यात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. राम कृष्ण हरी.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अर्थ
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अभंग
devachiye dwari ubha kshan bhari abhang
0 टिप्पणियाँ