चहु वेदी जाण साही शास्त्री कारण अभंग अर्थ| चहु वेदी जाण साही शास्त्री कारण| Chahu Vedi Jan Sahi Shastra karan
अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग ॥ २ ॥
एक हरि आत्मा जिवशिव सम ।
वाया तु दुर्गमा न घाली मन ॥ ३ ॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥
- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग
चहु वेदी जाण साही शास्त्री कारण अभंग अर्थ| चहु वेदी जाण साही शास्त्री कारण| Chahu Vedi Jan Sahi Shastra karan
राम कृष्ण हरी वारकरी बंधुनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थात माऊलींनी लिहिलेल्या हरिपाठातील द्वितीय क्रमांकाचा अभंग "चहु वेदी जाण साही शास्त्री कारण" या अभंगाचा आपण थोडक्यात आणि सोप्या शब्दांत अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अभंगाच्या सुरुवातीस संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, चार वेद, सहा शास्त्र तसेच अठरा पुराणे यांचा सार म्हणजे हरी होय. ज्ञानेश्वर महाराजांनी चार वेद, सहा शास्त्र व 18 पुराणांचा अभ्यास केला आणि त्यामधून त्याचा सार जेव्हा काढला तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना अनुभवास आले की हे सर्व ग्रंथ व पुराने केवळ हरीची महती गात आहेत. म्हणून महाराज सांगतात की, तुम्ही हरी हरी म्हणा जेव्हा तुम्ही हरी हरी म्हणणार, देवाचे नाम जप करणार त्यावेळी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हरी हरी म्हणण्यास सांगतात अर्थात देवाचे भजन आणि नामजप करण्यास सांगतात.
अभंगाच्या दुसऱ्या चरणात माऊली उदाहरण देऊन स्पष्ट करतात की, ज्याप्रमाणे आपण दह्याचे घुसळण करतो आणि त्यामधून साररुपी लोणी काढून घेतो आणि व्यर्थरूपी ताक टाकून देत असतो, त्याचप्रमाणे चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांतील साररुपी हरीचे नाम आत्मसात करा व व्यर्थ अशा कथा टाकून द्या.
पुढे माऊली सर्वसामान्यांना उपदेश करून सांगतात की, हरी हा एकच आत्मा सत्य आहे आणि तोच आत्मा प्रत्येक जीवामध्ये व शिवा मध्ये समान आहे. म्हणून, तू व्यर्थ ठिकाणी आपले मन घालवू नको आपले मन आणि चित्त हे देवाच्या चरणी ठेव, देवाची नित्य भजन कर आणि हरी हरी म्हण ज्याने तुझा उद्धार होईल.
शेवटच्या चरणात माऊली आपला स्वतःचा अनुभव सांगतात की, मी त्या वैकुंठात राहणारे हरीचे नित्यनेमाने पाठ करतो, त्याचे भजन करतो, त्याचे नाम जप करतो म्हणून माझा उद्धार झाला आहे आणि यामुळे मला आकाशात भरलेल्या घनदाट ढगांसारखा तो हरी सर्वत्र दिसत आहे.
माऊलींच्या हरिपाठातील प्रत्येक अभंगाचा एक मोठा असा अर्थ निघत असतो आणि प्रत्येक अभंग देवाच्या जवळ जाण्यास आपल्याला प्रेरित करतो, तसेच देवावर आपले प्रेम कसे वाढेल याचा प्रयत्न करतो. आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत माऊलींच्या हरीपाठातील द्वितीय क्रमांकाछा अभंग "चहु वेदी जाण साही शास्त्री कारण" या अभंगाचा आपण थोडक्यात भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्यास अभंगाचा भावार्थ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, राम कृष्ण हरी.
चहु वेदी जाण साही शास्त्री कारण अभंग अर्थ
चहु वेदी जाण साही शास्त्री कारण
Chahu Vedi Jan Sahi Shastra karan
0 टिप्पणियाँ